पांढरपौनी येथील भीषण पाणी टंचाईग्रस्थाना आ.देवराव भोंगळे यांनी पाणीटँकर द्वारे पाणी पुरवठा केला

पांढरपौनीतील भीषण पाणी टंचाईला दिलासा — आमदार  देवराव भोंगळे यांच्या तत्परतेने टँकरद्वारे जलपुरवठा सुरु
— तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे यांच्या पुढाकाराने समस्या सोडवली

राजुरा तालुक्यातील पाढरपौनी गावामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन करत असलेल्या गावकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तालुका महामंत्री  दिलीप गिरसावळे यांनी पुढाकार घेतला.
सरपंच मंदा आत्राम,   पांडुरंग चन्ने वसंता वैरागडे,  राजू गिरसावळे प्रकाश पाटणकर यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्याशी तातडीने संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली.  जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे आमदार भोंगळे यांनी  विलंब न करता संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून पाढरपौनीसाठी  पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले.
या जलपुरवठ्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी यावेळी गावकऱ्यांना आश्वस्त केले की, भविष्यातही कोणतीही अडचण निर्माण झाल्यास प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्यात येईल.
या प्रसंगी पाढरपौनी गावचे सरपंच सौ. नंदाताई आत्राम, ग्रामसेवक कुबडे , पांडुरंग चन्ने, वसंता वैरागडे, नागोबा मोहारे, महादेव जेऊरकर, रमेश रोगे, सुधाकर वैरागडे, मनोहर रोगे, सुरेश जेऊरकर, अरुण खणके यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पाढरपौनी गावातील या समस्येचे वेळेवर निवारण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आमदार मा. देवराव भोंगळे आणि तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या