दोन दिवसा पासून पटवारी कार्यालय बंद

दोन दिवसापासून पटवारी कार्यालय बंद
बल्लारपुर/
बल्लारपुरातील पटवारी कार्यालय  दोन दिवसा पासून बंद असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे।या बाबत सांगितल्या जात आहे की शाळे कालेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिना रहिवासी दाखला ,उतपन्नाचा दाखला इत्यादी दाखल्या साठी पटवारी कार्यालयाची मंजुरी लागते त्या नंतरच त्यांचे मूळ प्रमाणपत्र बनण्याला गती येते।व सद्या शाळा कालेज सुरू झाल्या मुळे अशा दाखल्याची आवश्यक गरज वाटते व नेमके या वेळेलाच पटवारी कार्यालय सतत दोन दिवसांपासून बंद असल्याने पालक व विद्यार्थी वर्गात असंतोष पसरलेला असल्याचे दिसून येत आहे।या बाबत तहसीलदार साहेब लक्ष देऊन सम्बधित पटवरीला नियमित कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी पालक वर्गा द्वारे करण्यात येत आहे।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या