नागपूर जिल्ह्यात 127 प्राथमिक शाळांमध्ये 580 शिक्षक बोगस
सर्वांचे पगार थांबले, माहिती अपलोड करण्याचे आयुक्तांचे आदेश
खोटी माहिती अपलोड करण्यासाठी मुख्याध्यापकावर संस्थाचालकांचा दबाव
नागपूर जिल्ह्यात 127 प्राथमिक शाळांमध्ये 580 शिक्षक बोगस असल्याचे निदर्शनात आले आहे. या सर्वाचा पगार थांबलेला आहे. या सर्वांचा सूत्रधार निलेश वाघमारे हा असल्याचा समोर आल्याचे दिसते.
मान. सचिन्द्रप्रताप सिंग (आयुक्त शिक्षण), शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक शिसंमा/ 2025/ टी-7/ शालार्थ/ 1328532 दिनांक 16 जुलै 2025 नुसार शालार्थ आयडी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाईज करण्याबाबत त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्वांना प्राप्त झाले आहे. यामध्ये फक्त शिक्षणाधिकारी नागपूर प्राथमिक व माध्यमिक, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक भंडारा प्राथमिक यांनी याबाबत पत्र काढलेले आहे. बाकींनी पत्र अद्याप काढलेले नाही. अशी चर्चा सुरू आहे की, सदर पत्र त्यांना लागू पडत नाही.
0 टिप्पण्या