भाजप चा रक्षा बंधन अभियान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(देवा भाऊ) यांना 22000 राख्या पाठवल्या
बल्लारपुर/
रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण चंद्रपूर जिल्हा ग्रामीणमधील प्रत्येक बूथवरून लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासाठी प्रेम व आपुलकीने तब्बल 22,000 राख्या पाठवल्या.
यामध्ये बल्लारपूर मंडळाने तब्बल 4,000 राख्या संकलित करून विशेष योगदान दिले. हे संकलन ज्येष्ठ नेते श्री. चंदनसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
या एकत्रित झालेल्या राख्या आज प्रदेश प्रतिनिधी, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार
देवरावजी भोंगडे यांना सुपूर्द करण्यात आल्या.
या कार्यक्रमात आमदार देवरावजी भोंगडे, जिलाध्यक्ष हरीजी शर्मा, अभियानाच्या संयोजिका सौ. वंदनाताई शेंडे व कुमारी अलका ताई आत्राम यांचे समयोचित मार्गदर्शन लाभले.
श्रीमती संध्या ताई गुरनुले, सौ. रेणुका दुधे, काशिनाथ सिंह, समीर केने, सौ. विद्या देवाडकर, सौ. नीलम सुरमवार, सौ. वैशाली जोशी, सौ. वैशाली बुद्धलवार, सौ. कांता ढोके, सौ. सारिका कणकम, सौ. संध्या ताई मिश्रा, सौ. शुभांगी शर्मा,
सतीश कणकम, श्री. घनश्याम बुरडकर, राजेश दासरवार, सौ. वैशाली बोलमवार, सौ. आरती अक्केवार, बंडू बुरांडे, राकेश ठाकरे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता
या अभियानातून बहिणींच्या अपार प्रेमाचा व भाजपा महिला मोर्चा कार्यकर्त्यांच्या संघटित सामर्थ्याचा उत्कृष्ट संदेश महाराष्ट्रभर पोहोचला आहे.
0 टिप्पण्या