चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी शाळेतील शिक्षक पगारापासून वंचित, अधिकारी यांचे दुर्लक्ष !
गणेश चतुर्थीच्या आधी पगार व्हावेत असा शासनाने जीआर काढला. याचा अर्थ शासन एकाच महिन्यात दोन पगार देण्याच्या मनस्थितीत होते.
परंतु काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे धोरणामुळे, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पगार खात्यावर जमा न झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समोर आलेली आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांचे नेते फक्त नावापुरतेच असल्याचे निदर्शनात आलेले आहे. त्यांना दररोज कार्यालयात येरझाऱ्या मारण्यामध्ये फार आनंद वाटतो आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घातलं असतं तर पगार हा नक्कीच वेळेवर झाला असता परंतु लोकप्रतिनिधींना या कामांमध्ये रस वाटत नाही असे दिसते.
बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण जेव्हा बाहेर आलं, तेव्हा घाबरलेले अधिकारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं होतं.
याचा अर्थ बोगस आयडी आपणच द्यायच्या, जेलमध्ये आपणच जायचे, संपाचा इशारा आपणच द्यायचा, काम बंद आंदोलन आपणच करायचे, आमच्यावर कारवाई करू नका हे आपण सुचवायचे, पवित्र पोर्टल अपवित्र आपणच करायचं हे संबंधितांना बरोबर समजते.
परंतु पगार वेळेवर द्यायला हवा. हे कसे का समजत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे.
0 टिप्पण्या