टीईटी पास ,नवीन नियुक्त उमेदवारांना, मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रत्येकी पंधरा हजारांची वसुली?

टीईटी पास, नवीन नियुक्त उमेदवारांना, मुळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रत्येकी पंधरा हजारांची वसुली ?
    शिक्षण विभागातील चंद्रपूर नंतर भंडारा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचा प्रकार !
           भागीरता भास्कर अनुसूचित जाती / जमाती शिक्षण संस्था आंभोरा ता कुही जिल्हा नागपूर अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील  निवड करण्यात आलेल्या उमेदवार रोहीणी रणभिड हुमणे व प्रफुल्ल हरिकिसन नागपूरे, यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक भंडारा रविंद्र सोनटक्के यांनी संस्था नागपूर येथील असल्याने शिक्षकांना मुळ प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक नागपूर जिल्हा परिषद कडुन यांचे नियमित वेतनासाठी प्रमाणपत्र आणण्यास सांगितले, संस्थेने त्या प्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक नागपुर विनंती केली, नवीन नियुक्त शिक्षकांना भंडारा ते नागपूर पाच दिवस चकरा माराव्या लागल्या, कार्यकारी शिक्षणाधिकारी निखिल भुयार यांना लिपिका मार्फत प्रत्येकी पंधरा हजारांची  रक्कम अदा करावी लागली असल्याचे समजते 
         वेतन पडताळणी प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक नागपुर असल्याने शिक्षणाधिकारी प्राथमिक भंडारा यांचे कडुन प्रमाणित करून आणण्यासाठी वेतन पथक प्राथमिक अधिक्षिका स्वाती ईश्वरकर यांनी  त्रुटी काढण्यात आली, वास्तविक शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा भंडारा यांनी स्वतः प्रमाण पत्राची तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी अंबादे व लिपिक तिजारे यांनी केली होती, परंतु उमेदवारांना त्रास व त्यांना आवश्यक घटकांची पूर्तता नाही, यामुळे भंडारा ते नागपूर येरझारा व्हाव्यात, शासनाने केलेले प्रयत्न सर्व प्रक्रिया पूर्ण झाली तरीही भ्रष्टाचारावर नियंत्रण नसल्याने माहे ऑगष्ट च्या देयकात दोन्ही उमेदवारांची नावे येऊ शकले नाही याबाबत चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील पवित्र प्रणाली नियुक्तीस शालार्थ आयडी प्रकरणे तपासणी प्रमाणे  एस आय टी नेमण्यासाठीची मागणी टीईटी पात्र उमेदवारांकडून होत असुन  रोष व्यक्त केला जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या