लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी शाळेतील शिक्षक पगारापासून वंचीत

लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी शाळेतील शिक्षक पगारापासून वंचित ?

लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकारी यांचे ऑगष्ट च्या वेतनाबाबत डंबरु वापर आंदोलन?

गणेश चतुर्थीच्या आधी पगार व्हावेत असा शासनाने जीआर काढला. तशा प्रकारच्या निधीची तरतूद केली होती. याचा अर्थ शासन एकाच महिन्यात दोन पगार करणार होते.
              लोकप्रतिनिधींनी शेतात राहुन फोटो टाकण्यात मग्न न राहता, प्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हित लक्षात घेऊन, माध्यमिक विभागाचा चार्ज, त्यांना  स्वाक्षरी अधिकार प्रदान करणे, नुसते शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय लक्ष घातलं असतं तर पगार हा नक्कीच वेळेवर झाला असता, लोकप्रतिनिधी त्या दिवशी धुऱ्यावर दिसत होते आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पगार होण्याचे स्वप्न रंगवत असल्याचे दिसून येत होते, ही बाब मान्य करणे आवश्यक आहे.
      काही अधिकारी आल्या आल्या सांगत फिरत होते की, चंद्रपूर जिल्ह्याला चांगले बनवायचे आहे. त्यांनी आपल्या कार्यालयात मनमानी सुरू केली आहे. त्यांच्या या  धोरणामुळे, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पगार खात्यावर जमा होऊ शकले नाही. ही खेदाची बाब आहे अशीही चर्चा माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांमध्ये आहे. 
जिल्ह्यातील शिक्षकांचे नेत्यांनी एजन्टशीप सुरू केली असून, दररोज कार्यालयात येरझाऱ्या मारून घरभरो अभियान चा  नारा देताना ची चर्चा कानावर येत आहे.
जिल्हा कोषागार अधिकाऱ्याची चर्चा केली असता त्यांनी याबाबत भाष्य करण्याचे टाळले. त्यांनी सांगितले की, संबंधित विभागाची चूक आहे त्यामध्ये आम्ही काय करू शकतो.
लोकप्रतिनिधी म्हणे कोषागार कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आहे.
 लोकप्रतिनिधींनी सर्वात आधी हे तपासले पाहिजे की, जे पगार गणेशोत्सव च्या आधी मिळायला पाहिजे होते. आपण त्यामध्ये बिलकुल रस घेतलेला नाही आणि आपणच रस घ्यायचा नाही आणि आपणच जिल्हा कोषागार कार्यालयावर मोर्चा करायचा हे कितपत योग्य आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या