बल्लारपूर येथील जनता हायस्कूल(डेपो शाखा)या शाळेत Al वर मार्गदर्शन

जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत AI वर मार्गदर्शन

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 17 नोव्हेंबर 2025 रोजी  AI वर मार्गदर्शन करण्यात आले.
 प्रेषिता बोडेकर मॅडम एम आय एमकेसीएल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना AI चे फायदे समजावून सांगितले. सोशल मीडिया जसे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट वापरताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल माहिती दिली.
आज-काल अकाउंट मधून पैसे चोरीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे तर अकाउंट सिक्युअर करताना पासवर्ड कसा बनवायचा याबद्दल सुद्धा माहिती दिली. सायबर सिक्युरिटी बद्दल माहिती दिली. अभ्यास करताना AI चा वापर कसा करायचा आणि कशाप्रकारे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे याबद्दल  प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखवले. ऑनलाइन गेमच्या विळख्यात कसे फसू नये याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखविले. 
हा कार्यक्रम वाजपेयी कॉम्पुटर इन्स्टिट्यूट बल्लारपूर तर्फे श्री. संजय वाजपेयी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. याप्रसंगी शाळेचे शिक्षक एम. डी. टोंगे, आर. के. वानखेडे, आर. बी. अलाम, एस. एम. चव्हाण, एस. एन. लोधे व विद्यार्थी वृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या