गौरी/पवनी विस्तारित प्रायोजना

 वेकोलिची गौरी _पवनी विस्तारित परियोजना
* प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मा.हंसराजअहिर,अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग,यांचे आभार मानले
  बल्लारपुर/
वेकोली बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत गोवरी,चिंचोली, पवनी , साखरी या गावांची जमीन अधिग्रहित होत असलेल्या गोवरी_पवनी,विस्तारित खुल्या परियोजनेत साध्या वाटणीपत्राच्या आधारे शेत जमिनीचे फेरफार झालेल्या प्रकरणात ,शेतकऱ्यांचे करारनामे व आर्थिक मोबदला राशी देय थांबवून वेकोली द्वारे या शेतकऱ्यांच्या नोकऱ्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले होते या बाबतीत
   शंकर बोढे, गोवरी व महादेव हिंगाणे,चिंचोली व अन्य शेतकऱ्यांनी  माजी खासदार हंसराज अहिर यांचे समक्ष उपस्थित करून ,मुख्यमहाप्रबंधक ,बल्लारपूर क्षेत्र,उपविभागीय अधिकारी राजुरा,जिल्हाधिकारी चंद्रपूर व वेकोली मुख्यालय स्तरावर हंसराज अहिर यांचा माध्यमातून सदर विषय मांडण्यात आला आणि या बाबत यश येऊन शेतीचा शेतकऱ्यांच्या आर्थिक मोबदला व नोकरीचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या सर्व शेतकऱ्यांनी हंसराज भैया अहिर यांची,
 कार्यालयात भेट घेऊन त्याचेंआभार मानूनआनंद व्यक्त केला तसेच जिल्हाधिकारी व वेकोली मुख्यालयाचा माध्यमातून  R/R लाभ यादी लवकरात लवकर मंजूर होऊन नोकरी चे प्रस्ताव त्वरित स्वीकारणे, प्रकल्पचे उत्खनन सुरू होण्या पूर्वी नोकऱ्यांची मंजुरी देणे आणि जिल्ह्यांतर्गत नोकरी देणे याबाबत चे  निवेदन  प्रकल्पग्रस्तांनी हंसराज भय्या अहिर ला सादर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या