मोहसीन भाई जव्हेरी कन्या व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

मोहसीन भाई जव्हेरी कन्या व कनिष्ठ महाविद्यालयात 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी राजभाषा दिवस' म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
बल्लारपूर/
. 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे साहित्यकार , ज्ञानपीठ पुरस्कार विजेते , थोर लेखक ,कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी "मराठी भाषा दिन" साजरा केला जातो .मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या प्राचार्या असमा खान खलिदी मॅडम तसेच ज्येष्ठ शिक्षिका मीना शेंडे मॅडम आणी ज्येष्ठ शिक्षिका भावना दुबे मॅडम उपस्थित होत्या. मराठी भाषा दिनाची माहिती इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी कु.तृप्ती बोरकुटे हिने दिली तर गीत गायन कु. जान्हवी गेडेकर या विद्यार्थीनीने केले. वर्ग आठवा हिंदी व मराठीच्या विद्यार्थिनींनी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विरामचिन्हे, म्हणी सादर केल्या  कु. ईश्वरी बल्की हिने भाषिक खेळ घेतला. कु. प्रणिता भानसे हिने कुसुमाग्रजांची "कणा "ही कविता म्हटली. वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. कु. उन्नती राखुंडे हिने "शिवगर्जना" म्हटली. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका भावना दुबे मॅडम यांनी मराठी भाषेची माहिती दिली व गीत गायन केले. तसेच मीना शेंडे मॅडम यांनी मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना  समजून सांगितले. कार्यक्रमाची सांगता "पसायदानाने"  करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कुमारी श्वेता तेलंगे या विद्यार्थिनींने केले. आभार प्रदर्शन कुमारी ईश्वरी बल्की हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या