महामार्ग निर्माण करणारी जीआरआय कंपनी द्वारे विनामोबदला शेतकऱ्याचा घरावर ताबा करण्याचा आरोप

महामार्ग निर्माण करणारी जी. आर.आय.कंपनी द्वारे विनामोबदला शेतकऱ्यांचा घरांचा जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न
राजुरा/
महामार्ग निर्माण करणारी जी आर आय कंपनी व महसूल अधिकाऱ्यांमार्फत विनामोबदला
शेतकऱ्यांचा घरांची जागा ताब्यात घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे।या बाबत आरोप करण्यात येत आहे की राजुरा पासून 10 किमी अंतरावर असलेल्या सोंडो येथील शेतकऱ्यांचे घराची जागा जबरदस्तीने कोणताही मोबदला न देता अधिग्रहण करण्याचा प्रकार चालू आहे सदर जमीनीचे अधिग्रहण करत असताना जमीन मालकाला त्या जागेचा मोबदला देणे गरजेचे आहे . परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला त्या जमीन मालकांना द
मिळालेला नाही  या बाबत सांगण्यात येत आहे की 15 लोकांच्या ग्रुपमध्ये अधिकाऱ्यांनी पैसे टाकलेले आहेत ज्यांची जमीन कमी आहे त्यांना सुद्धा सारखाच मोबदला आणि ज्यांची जमीन जास्त गेलेली आहे त्यांना सुद्धा तेवढाच मोबदला देण्यात येत असल्याचे लक्षात आल्यावर व त्या ग्रुप मधल्या एका सदस्यांनी पैसे सुध्दा उचललेले असल्याचे सांगण्यात येत आहे परंतु त्याची जमीन गेलेली नाही तसेच एका शेतकऱ्याच्या घराच्या जागेवर त्याच्या भावंडाचा नाव नोंदवलेले आहे दोन्ही 
 भावंडाचा हिस्सा नसताना सुद्धा असा 
 प्रकार अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे,सदर 
 जागेवर त्या शेतकऱ्याचे तीस वर्षापासून घर असल्याचे सांगण्यात येत आहे 
 सदर जागेचे कागदपत्रा नुसार शासनाने दिलेले  घर टॅक्स पावती व
नमुना आठ आहे  ही महत्वाचे कागद पत्रे असून जबरदस्तीने जमीन बळकावण्याचा प्रकार सुरू आहे। ऐन शेतीचा हंगामात शेतकऱ्यावर आभाळ कोसळलेले आहे त्यांची जनावरे कुठे बांधायची ?शेतीची काम करायची की आता जनावराची? आणि स्वतःची सोय करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे अशा अधिकाऱ्यांच्या धोरणामुळेच शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतात परंतु शासनाच्या धोरणासमोर निष्पाप शेतकऱ्याचे काहीही चालत नाही याबाबत
आमदार देवरावभाऊ भोंगळे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या