आ,किशोरभाऊ जोरगेवार द्वारा ऑनलाइन गेमिंग अप्सवर बंदि आणण्याची मागणी

ऑनलाइन गेमिंग ॲप्स वर बंदी आणण्याची मागणी आ,किशोरभाऊ जोरगेवार यांनी केली
चंद्रपूर/
चंद्रपूर चे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी विधानसभेत आन लाईन गेमिंग बाबत प्रश्न उपस्थित करून माहीत दिली की समाजात ऑनलाईन गेमिंग मुळे
आत्महत्या करण्याचे गुन्हे वाढले असून महाराष्ट्रात फक्त 97 प्रकरण दाखल झाल्याची आकडेवारी फारच कमी आहे प्रत्येक तालुक्यात अशाघटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत यावर विधानसभा सभागृहात आ,किशोरभाऊ जोरगेवार यांनी प्रश्न उपस्थित करून सरकारला प्रश्न विचारले यासाठी स्वतंत्र्य कायदा आणणार का ? कारण जंगली रमी ,ड्रीम इलेव्हन, एमपीपीएल ,माय इलेव्हन सर्कल,, वन एस बी टी यासारख्या  जुगार खेळणाऱ्या जाहिरात करून युवकांमध्ये जुगाराची सवय लावली जाते अनेक सेलिब्रिटी  या जाहिराती करतात ही लाजिरवानी बाब आहे या बाबतीत सरकारने तत्काळ कठोर कायदा आणावा अशी मागणी आ, किशोरभाऊ जोरगेवार नि केली  तेव्हा मंत्री महोदयांनी सांगितले की सध्या ठोस कायदा नाही मात्र मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारला नियमावली साठी पत्र पाठवणार आहेत या कायद्यात धन शोधन निवारन अट  समाविष्ट करावी आणि अशा अप्स वर कठोर कारवाईसाठी स्पष्ट नियम बनवावेत अशी  मागणी आ,किशोरभाऊ जोरगेवारने सरकारकडे केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या