फिरते रुग्णालयाचा श्री हंसराज अहिर द्वारा आढावा व निरीक्षण

फिरते रुग्णालयाचा श्री हंसराज अहिर द्वारा आढावा व निरीक्षण

चंद्रपूर /
पूर्व केंद्रीय राज्यमंत्री व
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून लोकसभा क्षेत्रात सुरू झालेल्या एचपीसीएल, बीपीसीएल व गेल या कंपनीच्या फिरते रूग्णालय ॲम्बुलॅन्स सेवेचा शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे सविस्तर आढावा घेतला. कोरपना, घाटंजी, झरी जामणी, भद्रावती तालुक्यात रूग्णांच्या सेवेत हे फिरते रूग्णालय कार्यरत आहे.
यावेळी अहीर यांनी आरोग्य सोयीसुविधा, औषधी, रूग्णसंख्या, आजाराचे स्वरूप आदींचा उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. सेवेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. योग्य त्या विधायक सुचना करीत अहीर यांनी जास्तीत जास्त रुग्ण सेवा रूग्णांपर्यंत पोहचण्याकरिता नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करून ग्रामिण आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यास सुचित केले.
या बैठकीस एचपीसीएल, बीपीसीएल व गेल फिरते ॲम्बुलॅन्स रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या