माजी मंत्री व आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांचा प्रयत्नामुळे मार्गी लागणार चंद्रपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे मार्गी लागणार चंद्रपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना*

*प्रलंबित योजनेसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे भक्कम पाठपुरावा*

*आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे होणार स्वतंत्र बैठक* 

*प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी लवकरच बैठक; निधी उपलब्धतेचे दिले पाणीपुरवठा मंत्र्यांनी आश्वासन*

 *मुंबई : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पाणीपुरवठा मंत्र्यांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे. त्यानिमित्ताने आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या आणखी एका लोककल्याणकारी विषयाला यश प्राप्त होणार आहे.*

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ' हर घर पाणी' या योजनेत निर्धारित वेळेत प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याची योजना आखण्यात आली. या योजनेला वेळ लागत आहे. बल्लारपूर मतदारसंघ तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांसाठी 47 कोटी रुपयांची तात्काळ तरतूद करावी. कार्यकारी अभियंत्यांचे रिक्त पद त्वरित भरावे, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. यावर पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्ह्यासाठी वेगळी बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आमदार श्री. सुधीर मनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेचे आकडेवारीसह अभ्यासपूर्ण विवेचन केले. ही योजना प्रत्येक नागरिकासाठी किती आवश्यक आहे, त्यात कशा अडचणी येतात, अधिकाऱ्यांच्या पातळीवर कसा विसंवाद होतो यावर विस्तृतपणे भाष्य केले. ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने 2026 पर्यंत प्रत्येकाच्या घरी शुद्ध पाणी जावे, हा विचार मांडला. पण प्रलंबित योजनांमुळे या मोहिमेत अडसर निर्माण होत आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठा योजनेची कामे प्राधान्याने व्हायला हवीत.’ कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. ते तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली.

मंत्रालयात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील गावाच्या पाणीपुरवठा योजने संदर्भात बैठक घेण्यात यावी. तसेच एक बैठक चंद्रपूरला घेतली जावी. रखडलेले काम सुरू होण्यासाठी दोन महिन्यात 43 कोटी रुपये उपलब्ध करावे, या मागण्यांचाही यामध्ये समावेश होता.

*आ. श्री. मुनगंटीवार यांच्या मागणीला यश*
पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना योजनांच्या संदर्भातील प्रगती आणि अडचणी संदर्भात विवेचन केले. तसेच बल्लारपूर मतदारसंघ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेसंदर्भात तात्काळ बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या