कलामंदिर गोकुल नगर वॉर्डात वॉटर एटीएम मशीनचे उद्घाटन
बल्लारपूर: गोकुळ नगर वॉर्डची लोकसंख्या सुमारे ८ ते १५ हजार आहे. नागरिकांनी अनेक दिवसांपासून तेथे थंड पाण्याचे एटीएम बसवावे अशी मागणी केली होती. नागरिकांनी माजी नगरसेवक सिक्की यादव यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की जानेवारी ते एप्रिल या काळात खूप उष्णता असते आणि त्या वेळी त्यांना थंड पाणी मिळत नाही. त्यासाठी कलामंदिर जवळ थंड पाण्याचे एटीएम बसवण्यात यावी निवेदन देण्यांत आलें.माजी नगरसेवक सिक्की यादव यांनी बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना विनंती केली आणि वॉटर एटीएमला तात्काळ मंजुरी कऱण्यात यावी. आज दिनांक रविवार ७ जुलै रोजी आषाढी एकादशी व मोहर्रम निमित्त वाटर एटीमचे ज्येष्ट नागरीक बागडे काका यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गोकुल नगर वार्डतील नागरिकांना मुख्याधिकारी विशाल वाघ व माजी नगर सेवक सिक्की यादव चे आभार मानले.
यावेळी माजी नगरसेविका रंजीता बीरे, सविता नाईक, एटीम ऑपरेटर कुणाल धकाते, बल्लारपूर शिवसेना तालुका अध्यक्ष प्रकाश पाठक, शहर अध्यक्ष बाबा साहू, क़नोबा बांगडे, संजू चार्ल्स, नाना वाकुडकर, राजू मेकलवार, दस्तगीर शेख, यूसुफ शेख, दशरथ नंदाराम, दिलीप नाइक, ओमप्रकाश शाह, सुनील जायसवाल, अशोक पटेल, अशोक नाइक, मनोज मुखिया, मोनू शर्मा, श्रवण दुबे, ईश्वर सोमकुंवर, प्रवीण दड़मल, विद्या भूषण राय, संतोष वर्मा, फ़ज्जू शेख, सलीम शेख,शनील जैसवाल, विजय गावनडे, राकेश तिवारी, मिश्रा, रामटेके, अशोक महतो व कार्यकर्ते उपस्थीत होते.
0 टिप्पण्या