पवित्र पोर्टलच्या मामाध्यमातून शिक्षकांना पैशाची मागणी,माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथील प्रकार

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांना पैशाची मागणी
माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथील प्रकार
शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे चर्चा सुरू

शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती सुरू केलेली आहे. त्यामध्ये निवड झालेल्या शिक्षकांना माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून वेरिफिकेशन करून प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजार रुपयाची मागणी शिक्षणाधिकारी यांच्यातर्फे करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे.
हे सर्व प्रकरण शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे पोहोचले असून त्या ठिकाणी शिक्षकाने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर  माहिती दिली आहे. या सर्व प्रकरणासाठी कुणी रमेश पातळे नावाचे शिक्षण अधिकारी माध्यमिक हे जबाबदार असल्याचे सांगितल्या जात असल्याची चर्चा सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या