राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे 19 आगस्ट 2025 पासुन बेमुदत कामबंद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत कामबंद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांचा दिनांक: 14/03/2024 च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजनाबाबत निर्णय घेण्यात आला होता. परंतु सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही  
अद्यापपर्यंत  राज्य शासनाकडून व संबंधित प्रशासनाकडून त्यावर अंमलबजावणी झालेली नाही.  यासंबंधी मान. महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे राज्य 
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन भाषणातील मुद्दा क्रमांक 52 नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांचे 
समायोजनाबाबत मान. नाम. प्रकाश आंबिटकर 
आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या दिनांक:08/07/ 2025 रोजी प्रत्यक्ष भेटीदरम्यान समायोजन लवकरात लवकर होण्याकरीता मान. मुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडवणीस यांची व सचिव-1 सार्वजनिक आरोग्य विभाग यांची मीटिंग आयोजित करणार 
असलेबाबत सांगितलेले होते. दरम्यान दिनांक: 10 व 11 जुलै 2025 रोजी दोन दिवशीय लक्षवेधी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आले. त्यावेळी  दिनांक 10 जुलै 2025 रोजी मान. आरोग्यमंत्री यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समितीचे शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान समायोजनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी दिनांक: 15 जुलै 2025 रोजी मान. आरोग्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली मान. सचिव ग्राम विकासमंत्री, मान. सचिव नगरविकास मंत्री, मान. सचिव वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच मान. सचिव-1, मान. सचिव-2 सार्वजनिक आरोग्य विभाग यांची एकत्रित मीटिंग घेण्यात येईल असे आश्वासन मान. आरोग्य मंत्री महोदय यांनी दिल्याने यापूर्वीचे दिनांक 21 जुलै 2025 पासून चे नियोजित कामबंद आंदोलन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून स्थगित करण्यात आलेले होते. परंतु समायोजन प्रक्रियेबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण राज्यामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन करणे पूर्वी नागरिकांचे आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये. याकरीता संबंधितांना 14 दिवसाची रितसर कालावधी देण्यात आलेला होता. परंतु सदर कालावधीतही कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत कोणतीही दखल न घेतल्याने  मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण राज्यांमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहे. अशी माहिती राज्य समन्वयक राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समिती महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या