*राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता नामवाड यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप पक्षप्रवेश.*
*जिवतीकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची आमदार देवराव भोंगळे यांची ग्वाही.*
जिवती, दि. ३१
जिवती हा आकांक्षित तालुका असला तरी आम्ही त्याकडे आकांक्षावादी तालुका म्हणून पाहतो. पहाडावरील प्रत्येक प्रश्नांच्या निराकरणासाठी मी सातत्यपूर्ण प्रयत्नशील असून आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर असेल अशी भावना आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.
स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयात काल (दि. ३०) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या तालुकाध्यक्षा सुनीता नामवाड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी केलेल्या स्वागतपर मार्गदर्शनात ते बोलत होते.
या नवप्रवेशितांमध्ये देवधर आंबटवाड, रोशन नानवाड, दिनेश मोतेवाड, सुमित मोतेवाड, सुभाष सुर्यवंशी, बाबू कामडे, मिथुन जावले, दिनेश सोनकांबळे, राजू राजपंगे, भगवान कुंटेवाड, संभाजी भालेराव, दत्ता भोगे, बाबू वाघमारे, देविदास गोतावळे, चेतन मोरे, सरिता नानवाड, दैवशाला आंबडवार, कचरू मोरे, कन्हैया गुंटे, जळबा शिंदे, सौरभ मोतेवाड, दामोदर गायकवाड, बालाजी मोतेवाड, उत्तम मेकाले, अरविंद मोतेवाड, दत्ताराव डुकरे, बळीराम जाधव, चंद्रकात कांबडे, मंगल मोतेवाड, अनुसया, अरविंद कांबळे, चरणदास गायकांबळे व परमेश्वर जाधव यांचा समावेश आहे.
पुढे बोलताना, जिवती तालुक्यातील बहुप्रलंबीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी आमदार झाल्यापासून प्राथमिकतेने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व महसूलमंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे हे देखील या सर्व प्रश्नांच्या निराकरणासाठी सकारात्मक आहेत. त्यामुळेच जिवतीकरांचा आपल्या महायुती सरकारप्रती विश्वास अधीक दृढ होत चालला असून त्या माध्यमातूनच याठिकाणी अनेकांचा भाजपात पक्षप्रवेश होत आहे. आज पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे मी भाजप परीवारात मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील संघटनात्मक वाटचालीकरता भरपूर शुभेच्छा देतो. असेही ते म्हणाले.
0 टिप्पण्या