बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नागपूर येथिल शिक्षण विभागात प्राथमिक मध्ये 633 चे पगार बंद ,423 चे पगार सुरू

बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नागपूर येथे शिक्षण विभाग प्राथमिक मध्ये 633 चे पगार बंद, 423 चे पगार सुरू

नागपूर/
बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नागपूर येथे शिक्षण विभाग प्राथमिक मध्ये 633 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार बंद करण्यात आलेले आहे. परंतु 423 जणांचे पगार सुरू आहे.
शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर विभागातील एकूण शालार्थ प्रकारे 1056 आहेत. त्यामध्ये संचिका उपलब्ध नसलेली 633 प्रकरणे आहेत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे  423 संचिका उपलब्ध आहेत. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग, नागपूर कार्यालयाकडे 375 संचिका उपलब्ध आहेत. संचिका उपलब्ध असलेली 423 प्रकरणांपैकी 205 प्रकरणांची तपासणी झालेली आहे. 218 प्रकरणांची तपासणी सुरू आहे. असा अहवाल डॉ. महेश पालकर शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय (योजना) पुणे यांनी दिलेला आहे.

त्यामध्ये, प्रफुल्ल विठ्ठल गौरकर, विद्या विकास उच्च प्राथमिक विद्यालय शिवछत्रपती नगर खरबी नागपूर, संत एकनाथ उच्च प्राथमिक शाळा दिघोरी नागपूर
१) प्रीती संदीप पुसदकर
२) भारती चंद्रकांत बांते
यांचा पगार बोगस शालार्थ आयडी असूनही सुरू असल्याची चर्चा आहे.
यामध्ये  श्री. चिंतामण वंजारी शिक्षणाधिकारी प्राथमिक, सौ. रोहिणी कुंभार शिक्षणाधिकारी प्राथमिक, श्री. रवींद्र काटोलकर शिक्षणाधिकारी प्राथमिक व श्री. सिद्धेश्वर काळुसे, शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व नागपूर जिल्हा: नागपूर यांचा हात असल्याची चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या