अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाखांच्या धनादेशाचे वितरण

*अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांच्या धनादेशाचे वितरण*

कापणगाव गावाजवळ २८ ऑगस्टला ट्रक ऑटोच्या धडकेत झाला होता ६ जणांचा अपघाती मृत्यू

आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश....

राजुरा : शहरापासून अवघ्या २ कि.मी अंतरावरअसलेल्या कापणगाव येथे २८ ऑगस्ट रोजी  झालेल्या हायवा ट्रक _ऑटोच्या भिषण अपघातात  रवींद्र हरी बोबडे, (वय ४८,) रा. पाचगाव, शंकर कारू पिपरे, (वय ५०) रा. कोची, सौ. वर्षा बंडू मांदळे, (वय ४१) रा. खामोना, तनु सुभाष पिंपळकर, (वय १८)रा. पाचगाव, ताराबाई नानाजी पपुलवार, (वय ६०) रा. पाचगाव आणि ऑटो चालक प्रकाश मेश्राम, (वय ५० ) रा.पाचगाव या सर्व सहा प्रवाशांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत अपघातग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार नाही तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका घेतली.त्यानंतर राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांनी मृतांच्या कुटुंबियांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करीत प्रशासकीय अधिकारी,मृतांचे नातेवाईक व ऑटोला धडक देणाऱ्या ट्रक कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये सर्वानुमते चर्चा घडवून आणली.त्यानंतर मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख देण्याचे मान्य केल्यानंतर अपघातातील मृतांवर त्यांच्या स्वागावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी आमदार देवराव भोंगळे यांचे हस्ते अपघातग्रस्त मृतांचे कुटुंबीय आशा मेश्राम, सुभाष पिंपळकर, कांताबाई पिंपरे, बंडू मांदाडे, मीना बोबडे, सुनीता बोबडे, राजेश पुपलवार, संजय पुपलवार, लक्ष्मी पुलगमवार यांचेकडे  भाजपा जनसंपर्क कार्यालयात अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांच्या वारसांना    कंपनीतर्फे प्रत्येक ४ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे,राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, शहराध्यक्ष सुरेश रागीट, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रफुल घोटेकर, अजय राठोड, महामंत्री सचिन बल्की,बाबुराव मडावी , सुरेश धोटे, नितीन सिडाम, नितीन वासाडे, दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे, सागर भटपल्लीवार, छबिलाल नाईक, प्रदीप मोरे, प्रफुल कावळे, वैभव पावडे, प्रदीप पाला, व अपघातग्रस्त कुटुंबातील नातेवाईक, नागरिक व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या