अतिवृष्टी मूळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालक मंत्र्यांकडून पाहणी

*अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालक मंत्र्यांकडून पाहणी
*बांधावर जाऊन पिढी शेतकऱ्यांसोबत संवाद 
चंद्रपूर /
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चिमुर आणि वरोरा तालुक्यातील शेतमालाची राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक उके यांनी आज 24 तारखेला बांधावर जाऊन पाहाणी केली व शेतकऱ्या सोबत संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल होते चिंमुर तालुक्यातील बीसी येथे प्रकाश खाटीक व विलास खाटीक यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी व वाहनगाव येथील बालाजी जुमनाके बोथली येथील नितीन खापणे खामगाव येथील शालू रामटेके तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव( बु) येथील प्रफुल सोनकर भेंडाळा येथील संजीव उरकुडे या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बाधित शेतमालाची पाहणी केली पालकमंत्री डॉक्टर उके म्हणाले या परिसरातील नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी करताना जाणवली की अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील पंचनामेच्या अहवाल जिल्हाधिकारी कार्यलमार्फत तत्काळ शासनाला पाठवला जाईल पिडीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान कसे मिळवून देता येईल यासाठी निश्चित प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे सोयाबीनचे दाणे अतिशय छोटी असून काही भागात कटायला सुद्धा परवडणार नाही अशी सोयाबीनची परिस्थिती आहे गत महिन्याच्या भरपाईचा निर्णय शासन स्तरावर झाला आहे सप्टेंबर महिन्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून नुकसानीच्या सर्व अहवाल शासन स्तरावर पाठवण्यात येणार आहे असे ते म्हणाले की चिमूर तालुक्यातील पाहाणी दरम्यान आमदार कीर्ती कुमार भांगडीया जिल्हाधिकारी विनय गौडा , मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर संतोष थिटे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे तहसीलदार श्रीधर राजमाने, कृषी अधिकारी शंकर तोटावर आदि उपस्थित होते तर वरोरा तालुक्यातील गावांच्या पाहणी दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर आमदार करण देवताडे जिल्हाधिकारी विनय गौडा मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपविभागीय अधिकारी अतुल जठाळे तहसीलदार योगेश कोटकर यांच्या सह सर्व अधिकारी उपस्थित होते चिंमुर आणि वरोरा तालुक्यातील नुकसाना अतिवृष्टी मुळे चिमूर तालुक्यातील बाधित क्षेत्र 3017.53 हेक्टर असून बाधित शेतकऱ्यांची एकूण जनसंख्या 3418 आहे तर वरोरा तालुक्यात एकूण बाधित क्षेत्र 592.25 हेक्टर आणि शेतकरी संख्या 1408 आहे।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या