जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे शिक्षक दिन साजरा
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. एका दिवसासाठी शाळा हस्तांतरण करण्यात आली.
स्वंयशासन कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये राशी वेले, रूपाली निमकर, त्रिशाली महानंद, आनंदी गवई, शिक्षा रामटेके, राधिका मांदाळे, रक्षु शिंदे, वैशाली महानंद, अनुष्का दुर्गे, अंजली भडके यांनी शिक्षकांची भूमिका बजावली तसेच अमनसिंह नायक याने शिपायाची भूमिका बजावली.
भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोला मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका त्रिषाली महानंद यांनी प्रास्ताविकात शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले.
रूपाली निमकर हिने शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकाची भूमिका, शिक्षकाची कार्य हे समजवून सांगितले.
आनंदी गवई हिने आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमात बी. बी. भगत (मुख्याध्यापक), आर. के. वानखेडे, एम.डी. टोंगे, आर. बी. अलाम, यु. के. रांगणकर, एस. एन. लोधे मॅडम, एस. एम. चव्हाण, गणेश चंदावार, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना नाश्ता वितरित करण्यात आला.
0 टिप्पण्या