*ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य मिरवणूक
*आ.देवरावजी भोंगळे मिरवणुकीत सहभागी
कोरपना/
६ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कोरपना शहरातून मुस्लिम बांधवांकडून निघालेल्या भव्य मिरवणुकीत आ.देवरावजी भोंगळे सहभागी होऊन त्यांनी उपस्थितांना ईदेच्या शुभेच्छा दिल्या.
हा उत्सव समाजात शांती, बंधुता , एकात्मता आणि मानवतेचे मूल्य दृढ करो आणि सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी यावी अशी शुभेच्छा याप्रसंगी व्यक्त केली.
त्यावेळी त्यांचा सोबत तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, अरूण मडावी, विशाल गज्जलवार, अबरार अली, राष्ट्रवादीचे नेते आबिद अली, मौलाना शेर खान, किशोर बावणे, सुभाष हरबडे, इसाक कादरी, असरार अली, नदीम खान, महमद खान, शहावाज अली, उमेश पालीवाल, दिनेश ढेंगळे, पवन बुरेवार, शैलेश परसुटकर व अन्य नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या