जनता हायस्कूल(डेपो शाखा)बल्लारपूर येथे विध्यार्थी मेळावा संपन्न

जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत विद्यार्थी मेळावा संपन्न 

जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 17/ 12/ 2025 रोजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. 
याप्रसंगी वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक  आर. के. वानखेडे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन व केक कापून सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील मुख्याध्यापक बी. बी. भगत तर प्रमुख पाहुणे वर्ग नववीचे वर्गशिक्षक यु. के. रांगणकर सर होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी मेळावा घेण्याची माहिती विशद केली.
कार्यक्रमात एम. डी. टोंगे, आर. बी. अलाम, एस. एन. लोधे मॅडम, एस. एम. चव्हाण, गणेश चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वृंद उपस्थित होते. शेवटी 
स्नेहभोजन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या