*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय बालिका दिवस साजरा*
आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम, रिता मॅडम, मीना मॅडम, आमटे मॅडम, सुनिता मॅडम, साळवे सर, शबाना मॅडम यांनी दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बालिका दिनाविषयी माहिती सांगून शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच रिता मॅडम यांनी ओवी गायन केली. वर्ग पाचवीच्या व सातवीच्या विद्यार्थिनी वजीहा कलीम शेख व राधिका तिवारी, अनन्या काळबांडे, तुलाजा कर्ण यांनी बालिका दिवसाविषयी माहिती सांगितली. स्पंदिका जवादे, आराध्या थुल, सलोनी मडावी, अक्षरा वडघुरे, शिवानी दोरशेट्टीवार यांनी सावित्रीबाई विषयी गीत म्हटले.बनकर सर, मीना मॅडम यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. वर्ग पाचवी ( हिंदी) ची विद्यार्थिनी सोनम खेंगर हिने "मी सावित्री बोलतोय" एक पात्री नाटक सादर केले,वर्ग सहावी (मराठी) व सातवी (हिंदी), वर्ग आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईच्या कार्याविषयी नाटिका प्रस्तुत केली. या कार्यक्रमाचे संचालन मुस्कान शेख या विद्यार्थिनींनी तसेच आभार प्रदर्शन किसान मॅडम यांनी केले.
0 टिप्पण्या