सर्व धर्मीय शुभविवाह सोहळा संपन्न

सर्व धर्मीय शुभविवाह सोहळा संपन्न
चंद्रपूर /
मिनाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या विद्यमाने विश्वकर्मा मंदिर डॉक्टर नगराळे हॉस्पिटल एकोरीवाड चंद्रपूर येथे सर्व धर्मीय विवाह सोहळा मोठ्या थाटामाटा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदीप कांबळे होते तर मुख्य अतिथी म्हणून नागपूरचे प्राख्यात वक्ता खोब्रागडे साहेब ,तसेच  विशेष अतिथी म्हणून समाज कल्याण अधिकारी बनसोड साहेब  होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्य मीना  कांबळे यांनी केले आभार प्रदर्शन आम्रपाली कांबळे यांनी केले आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्ञानदीप कांबळे म्हणाले की या देशातील समाजात विषमतेचे कवच तोडून समता प्रस्थापित करण्यासाठी सर्व जाती धर्मात विवाह सोहळ्याचे आयोजन करून प्रस्तापित जाती धर्माला दूर सारून भावी वर वधुनी विवाह करावे व समाजाने सुद्धा अशा आंतर जातीय विवाहिताना प्रोत्साहित करावे जेणे करून जाती धर्मातील विषमता नष्ट होऊन समता प्रस्थापित होण्यास मदत मिळेल।असे विचार मांडले  या मेळाव्यात 21 विवाहित जोडप्याचे मंगल परिणय लावून देण्यात आले  देशातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून प्रास्थाविके प्रमाणे वधू-वरांनी आपले जीवन जगावे असे कळकळीचे आवाहन संस्थेच्या उपाध्यक्ष मीना कांबळे यांनी केले ,तसेच उपस्थित अतिथी  शितल मॅडम ,खोब्रागडे साहेब ,बनसोड साहेब,शरद गावंडे यांनी थोडक्यात आपले विचार मांडले कार्यक्रमाचे यशस्वी साठी  संस्थे तर्फे रितू शिंदे ,बाळू आंबेकर, बाळू खोबरागडे, पवन भुजाडे ,गिरीधर वेले,विशाल मेश्राम,  यांनी सहकार्य केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या