आ.देवराव भोंगळे व अधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांसह अपघात स्थळाची पाहणी

आ.देवराव भोंगळे व अधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यासह अपघात स्थळाची पाहणी
राजुरा/
राजुरा-गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावर कापणगांवजवळ २८ ऑगस्ट रोजी ट्रक-ऑटोच्या धडकेत झालेल्या भिषण अपघातात पाचगांव, कच्ची, खामोना येथील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघात स्थळाची दि.26 सप्टेंबर ला पाहणी करीत महामार्गावरील रस्ते अपघात टाळण्यासाठी तसेच भविष्यात अशाप्रकारचे दुर्दैवी अपघात घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आ.भोंगळे यांनी  एनएचआयच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी जिचकर साहेब, श्री. पाठकजी, अरविंद कुमार, विनोदकुमार मिना, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे, तालुका महामंत्री हरिदास झाडे, सरपंच बत्ता माथनकर, प्रदीप मोरे, सागर भटपल्लीवार, दिपक झाडे यांसह  कापणगांव येथील नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या