आ,देवराव भोंगळे यांनी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली

आ,देवराव भोंगळे यांनी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली
राजुरा/
राजुरा येथे कृषी विभागाच्या कामाचा व विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्याच्या उद्देशाने दि 29 सप्टेंबर ला अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत विशेषतः पोखरा (PoCRA - नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) आणि कृषी समृद्धी योजनेच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.
यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'पोखरा' व 'कृषी समृद्धी' या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती व प्रगतीचा अहवाल सादर केला. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, आणि उद्दिष्टपूर्तीसाठी असलेल्या अडचणींवर चर्चा करीत मार्गदर्शन केले. 
यावेळी बोलताना, शासनाच्या या दोन्ही योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. त्यामुळे ही माहिती केवळ कागदोपत्री न राहता, प्रत्येक कृषी समृद्धी योजनेची माहिती व लाभ हा सर्वदूर तळागाळातील गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर अधिक दौरे करून योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. तसेच, योजनांची माहिती देणाऱ्या कार्यशाळा आयोजित करून योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणावी. अशा सुचना केल्या. 
या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास जाधव, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन, गोविंद ठाकूर, श्रीमती गावडे, सचिन पानसरे यांचेसह विधानसभेतील चारही तालुक्यांमधुन सहाय्यक कृषी अधिकारी व कृषी सेवक आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या