श्री. राजू वानखेडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे कार्यरत शिक्षक श्री. राजू वानखेडे यांना बी द चेंज फाउंडेशन शिर्डी जिल्हा: अहिल्यानगर महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
श्री. राजू वानखेडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले अथक प्रयत्न आणि शैक्षणिक व सहशालेय कार्यातील आदर्श सेवेसाठी त्यांची निष्ठा, समर्पण भावना आणि परिश्रम हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. सदर कार्यक्रम दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी शिर्डी येथे घेण्यात आला होता. त्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्यासाठी, शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी व समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
श्री. राजू वानखेडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबाबत श्री. बी. बी. भगत (मुख्याध्यापक), श्री. एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक), श्री .यु. के.
0 टिप्पण्या