जनता हायस्कूल(डेपो शाखा)बल्लारपूर येथे श्रीनिवास रामानुजन व साने गुरुजी यांची जयंती साजरी

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे श्रीनिवास रामानुजन व साने गुरुजी यांची जयंती साजरी 

जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक: 24/ 12/ 2025 रोजी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन व साहित्यिक साने गुरुजी यांची जयंती संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक एम. डी. टोंगे तर प्रमुख पाहुणे यु. के. रांगणकर, आर. बी. अलाम यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. 

प्रथमता मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन व साहित्यिक साने गुरुजी यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रमुख पाहुणे यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, श्रीनिवास रामानुजन यांनी गणितामध्ये 39 नवीन संकल्पना  32 वर्षात मांडल्या. 1729, 2520 या संख्याबद्दल माहिती सांगितली. तसेच साने गुरुजी यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जनजागृती केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचे फार मोठे योगदान आहे.
अध्यक्षीय भाषण एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी केले.
प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन व आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमात एस. एम. चव्हाण, गणेश चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसहित विद्यार्थी वृंद उपस्थित होते.
शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किट तसेच पेनचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या